Breaking
जळगावताज्या बातम्याराजकीय

प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरींसह लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

मुंबई, दि. ३ (जनसंवाद live): महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि विचारांवर विश्वास ठेवत प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि निखिल संतोष चौधरी यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

भुसावळ आणि जळगावच्या विकासासाठी मोठी राजकीय ताकद उभी करणे, शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करणे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक ताकदीने काम करणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे मानले जात आहे.

या नव्या राजकीय वाटचालीत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते मा. गुलाबरावजी पाटील साहेब, पाचोरा आमदार किशोरअप्पा पाटील, आमदार बच्चूभाऊ कडू, चोपडा आमदार चंद्रकांत सोनवणे, मुक्ताईनगर आमदार चंद्रकांतपाटील आणि पारोळा आमदार अमोल पाटील, उपनेत्या सरिता माळी कोल्हे, जळगांव जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे अनिल चौधरी आणि भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या नेतृत्वाला नवी राजकीय ताकद मिळण्याची शक्यता आहे.

भुसावळच्या राजकारणात या प्रवेशामुळे पुढील काळात कोणते नवे समीकरण तयार होते, याकडे आता संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button