जळगावात ९ फेब्रुवारीपासून विनामूल्य उद्योजकता विकास प्रशिक्षण

जळगाव, दि.५ (जनसंवाद live): महाराष्ट्र शासनाच्या अमृत या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील, कोणताही शासकीय आर्थिक लाभ न मिळालेल्या समाजासाठी उद्योजकता विकास कार्यक्रम (E.D.P.) आयोजित करण्यात आला आहे.
हा प्रशिक्षण वर्ग ९ फेब्रुवारी २०२६ पासून जळगाव शहरात सुरू होणार असून १९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत चालणार आहे. १० दिवसांचा हा कार्यक्रम पूर्णतः विनामूल्य आहे. हा उपक्रम आय एम आर कॉलेज, मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या मागील बाजूस, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमाचा जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी amrut.jalgaon16@gmail.com या ई-मेलवर किंवा अमृत जिल्हा कार्यालय ८९, नवी पेठ, जळगाव, तसेच ७३९१०६५४७६ / ८२३७६५७१७८ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा. , असे आवाहन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. राजेंद्र कानडे यांनी केले आहे.




