Breaking
जळगावताज्या बातम्याराजकीय

स्थायी समिती सभापतीपदी चंद्रशेखर पाटील तर महिला बालकल्याण सभापती पदी सिंधु कोल्हे यांची बिनविरोध निवड

जळगाव, दि.२७ (जनसंवाद live): महानगरपालिकेच्या स्थायी समिती व महिला बाल कल्याण समितीच्या सभापती निवड संदर्भात आज दि. २७ शुक्रवार रोजी महानगरपालिकेच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात सभा संपन्न झाली. या सभेला पिठासीन अधिकारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकिरी मिनल करनवाल उपस्थित होत्या. त्यांच्या समवेत मंचावर महानगर पालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, तसेच नगरसचिव सतीश शुक्ला उपस्थित होते.

स्थायी समिती सभापती पदासाठी चंद्रशेखर पाटील यांचा एकमेव अर्ज आला. तसेच महिला बालकल्याण समिती सभापती पदासाठी सिंधु कोल्हे यांचाही एकमेव अर्ज आल्याने पिठासीन अधिकारी मिनल करनवाल यांनी दोघांची बिनविरोध निवड घोषित केली. या निवडी वेळी सभागृहात फक्त नगरसेवक यांनाच सभागृहात उपस्थित राहण्याची अनुमती देण्यात आली होती.

निवड झाल्यानंतर पिठासीन अधिकारी मिनल करनवाल यांनी स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती चंद्रशेखर पाटील व महिला बालकल्याण समितीच्या सभापती सिंधु कोल्हे यांनी दोघांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्यानंतर राज्यगीत व राष्ट्रगीताने सभेचा समारोप करण्यात आला. उपस्थित नगरसेवकांनी दोघा नवनिर्वाचित सभापतींना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button