Breaking
जळगावताज्या बातम्याराजकीय

रिंगरोड वरील विद्युत यंत्रणा भुमिगत करण्यासाठी महापौर दिपमाला काळे यांची शासनाकडे ४५ कोटीची मागणी

जळगाव, दि.२९ (जनसंवाद live): शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या आणि अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या पिंप्राळा रेल्वे ओव्हर ब्रीज (ROB) ते सिंधी कॉलनी रिंग रोड परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. या रस्त्यावरील धोकादायक ठरणाऱ्या ‘ओव्हर हेड’ विद्युत तारा आणि खांब हटवून संपूर्ण यंत्रणा भूमिगत करण्यासाठी महापौर दिपमाला मनोज काळे यांनी पुढाकार घेतला आहे. या कामासाठी ४५ कोटी रुपयांच्या विशेष अनुदानाची मागणी त्यांनी राज्याचे मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे केली आहे.

वाहतूक कोंडी फुटणार, अपघात टळणार
जळगाव शहरात प्रवेश करताना पिंप्राळा आरओबी ते सिंधी कॉलनी हा रिंग रोड अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. सद्यस्थितीत या रस्त्याच्या मध्यभागी (सेंट्रल लाईन) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे खांब, रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) आणि उच्च व लघुदाब वाहिन्यांचे जाळे पसरलेले आहे. यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा येत असून अपघाताची भीतीही कायम असते.

असे होणार फायदे
रस्ता रुंदीकरण: विद्युत खांब भूमिगत झाल्यामुळे रस्त्याची प्रत्यक्ष रुंदी वाढणार असून वाहतूक सुलभ होईल.
प्रखर प्रकाश व्यवस्था: यंत्रणा भूमिगत झाल्यावर रात्रीच्या वेळी वाहनधारकांसाठी अद्ययावत आणि प्रखर पथदिवे लावणे सोयीचे होईल.
सौंदर्यीकरण: ओव्हर हेड वायर्सचे जाळे गायब झाल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडेल.

४५ कोटींचा निधी अपेक्षित
महापौरांनी दिलेल्या पत्रानुसार, महावितरण कंपनीकडून या कामाचा प्राथमिक अंदाज घेतला असता, यासाठी सुमारे ४५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जळगाव शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निधी विशेष अनुदान म्हणून उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती महापौरांनी पत्राद्वारे ना. गिरीश महाजन यांना केली आहे.

यावेळी महापौर दीपमाला काळे यांचे प्रतिनिधी म्हणून मनोज काळे, नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य अरविंद देशमुख, नंदकुमार अडवाणी आदी उपस्थित होते.

“शहरातील मुख्य रिंग रोडवरील विद्युत यंत्रणा भूमिगत झाल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटेल आणि अपघातांचे प्रमाणही कमी होईल असे मंत्री गिरीश महाजन यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button