छायाचित्र स्पर्धेत भूषण हंसकर यांना प्रथम पारितोषिक तर सचिन पाटील यांना द्वितीय
जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे 'विश्वासाची लेन्स' छायाचित्र स्पर्धेचे आयोजन

जळगाव, दि. ११ (जनसंवाद live): जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘विश्वासाची लेन्स’ ही जिल्हास्तरीय छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत भुषण हंसकर यांना प्रथम पारितोषिक तर सचिन पाटील यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असुन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आयोजित कार्यक्रमात बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार राजु मामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप गावित, आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाभरातून अनेक छायाचित्रकारांनी या स्पर्धेसाठी छायाचित्रे पाठवुन आपला सहभाग नोंदवला होता. हि स्पर्धा सहा विषयांमध्ये घेण्यात आली. १) सामाजिक छायाचित्र, २) पोलीस जनसेवा विषयी छायाचित्र, ३) गुन्हे विषयक छायाचित्र, ४) वाहतुक विषयी छायाचित्र, ५) जळगाव वारसा, ६) महिला सक्षमीकरण आणि ७) समाज जागृती संदर्भात रिल
निकाल खालील प्रमाणे:
१) सामाजिक छायाचित्र:- प्रथम क्रमांक सुमित देशमुख, द्वितीय क्रमांक अमळनेर येथील गणेश गोरखनाथ गांधारी
२) पोलीस जनसेवा छायाचित्र:- प्रथम क्रमांक सुमित देशमुख, द्वितीय क्रमांक सचिन पाटील
३) गुन्हे विषयक छायाचित्र:- प्रथम क्रमांक भुषण हंसकर, द्वितीय क्रमांक सुमित देशमुख.
४) वाहतुक विषयी छायाचित्र:- प्रथम क्रमांक आबा मकासरे, द्वितीय क्रमांक सचिन पाटील
५) जळगाव वारसा:- प्रथम क्रमांक भुषण हंसकर, द्वितीय क्रमांक तुषार मानकर
६) महिला सक्षमीकरण:- प्रथम क्रमांक सुमित देशमुख, द्वितीय क्रमांक तुषार मानकर
७) समाज जागृती संदर्भात रिल:- प्रथम क्रमांक अजय प्रकाश कुमावत
‘विश्वासाची लेन्स’ या जिल्हास्तरीय छायाचित्र स्पर्धेत भूषण हंसकर यांनी उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर दुहेरी मुकुट पटकावला आहे. त्यांनी ‘गुन्हे विषयक छायाचित्र’ आणि ‘जळगाव वारसा’ अशा दोन्ही वेगवेगळ्या श्रेणींमध्ये प्रथम क्रमांक पटकावून विशेष यश संपादन केले.
पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वास व समन्वय वाढवण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलीस दलाने या उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये भूषण हंसकर यांनी टिपलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांनी परीक्षकांची आणि उपस्थितांची मन जिंकली. जळगावचा वारसा आणि गुन्हे विषयक छायाचित्रे स्पर्धेच्या माध्यमातून समाजासमोर आणल्याबद्दल भूषण हंसकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.





