Breaking
जळगावताज्या बातम्यासामाजिक

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार

नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार

जळगाव, दि.५ (जनसंवाद live): यंदाच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस न झाल्याने जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. या हाकेला सकारात्मक प्रतिसाद देत रामेश्वर कॉलनी परिसरातील ‘विचार वारसा फाउंडेशन’ने यंदाचा नवरात्रौत्सव सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

विचार वारसा फाउंडेशन संचलित नवदुर्गा सार्वजनिक नवरात्री उत्सवाच्या काळात दुर्गा मातेच्या दर्शनासाठी व भव्य आरास पाहण्यासाठी नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या उत्सवादरम्यान जमा होणारी संपूर्ण देणगी व निधी दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी आमदार राजुमामा भोळे यांच्याकडे सुपूर्द केला जाईल, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांनी दिली.

फाउंडेशनच्या या संवेदनशील आणि स्तुत्य निर्णयाला संपूर्ण मित्र परिवाराने एकमताने पाठिंबा दिला आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आशिष राजपूत, मयूर डांगे, मनीष चौधरी, संकेत म्हस्कर, गितेश पवार, अमोल ढाकणे, अभिजित राजपूत, गौरव डांगे, ऋषी राजपूत, आकाश तोमर, प्रदीप राजपूत, अविनाश पाटील, राकेश कोळी, अजय मांडोळे, लोकेश निकम, चेतन राजपूत, मितेश वाघ यांच्यासह सर्व सदस्य व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

उत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या या निर्णयाचे जळगाव शहरातून सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button