शिवसेना नेते चंदक्रांत खैरे जळगाव जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर

जळगाव, दि. २१(जनसंवाद live): शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी मंत्री चंद्रकांत खैरे, मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक हरी शास्त्री, व गितेश राऊत हे गुरुवार व शुक्रवार दिनांक २२, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी दोन दिवसीय जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.
शुक्रवार दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे सलग ६ व्या वर्षी युवासेना आयोजित कुमार गट उत्तर महाराष्ट्रस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत युवा संवाद, युवासेना शाखा उदघाटन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू यांची विद्यार्थी हिताच्या विषयांवर चर्चा, पदाधिकारी बैठक आदी कार्यक्रम या दौऱ्यात संपन्न होणार आहे.
अशी माहिती युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हा युवाधिकारी निलेश चौधरी व महानगर युवाधिकारी प्रितम शिंदे यांनी दिली आहे.




