Breaking
जळगावऔद्योगिकताज्या बातम्या

सुरक्षेची नवी क्षितिजे! जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य ‘आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६

जळगाव, दि.१२ (जनसंवाद live): माहिती तंत्रज्ञान आणि सुरक्षा क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांची ओळख करून देण्यासाठी ‘जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटना’ (JJITA) तर्फे ‘JJITA IT आणि सुरक्षा एक्स्पो २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे. हा एक्स्पो दि. १३, १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी शहरातील खान्देश सेंट्रल मॉल येथे पार पडणार असून, याद्वारे जळगावकरांना आधुनिक तंत्रज्ञान जवळून अनुभवता येणार आहे.

​या तीन दिवसीय प्रदर्शनात साधारण ३० स्टॉल्स असून सीसीटीव्ही कॅमेरे, अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली, आयटी सोल्यूशन्स आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचे स्टॉल्स असणार आहेत. उद्योग क्षेत्रातील दिग्गज, नवोन्मेषक आणि धोरणकर्ते एकाच छताखाली येणार असून, उपस्थितांना थेट प्रात्यक्षिके (Live Demos) पाहण्याची आणि तज्ज्ञांशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

​दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष अतुल पाटील, उपाध्यक्ष सुनील घोलप, सचिव सुरेंद्र मेहंदळे यांनी प्रदर्शनाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. तंत्रज्ञान क्षेत्रात होणारे बदल सर्वसामान्यांपर्यंत आणि व्यावसायिकांपर्यंत पोहोचावेत, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

​या पत्रकार परिषदेला सदस्य योगेश चौधरी, विनोद सोनार, निलेश जैन, संदीप राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते. जास्तीत जास्त नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आणि व्यावसायिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button